शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड मनपाने विकसित केलेल्या मोशी येथील एकत्रित घनकचरा व्यवस्थापन केंद्राला (Integrated Solid Waste Management) डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे व श्रीम. पुनम मेहता, सह आयुक्त, विभागीय प्रशासन, पुणे यांनी दिनांक २८/११/२०२४ रोजी सकाळी ११.३० वा भेट दिली. सदर भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्री. शेखर सिंह, श्री.संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, श्री. हरविंदरसिंह बंसल, कार्यकारी अभियंता, श्री. योगेश आल्हाट, उप अभियंता उपस्थित होते. मा. विभागीय आयुक्त यांनी सदर भेटीदरम्यान राडारोडा व्यवस्थापन केंद्र, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, प्लॅस्टिक टु फ्युएल तसेच हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प यांना प्रत्यक्ष भेट देऊन तांत्रिक बाबींसह प्रकल्पाचे Financial Model याबाबत माहिती घेतली. सदर भेटीदरम्यान श्री. शेखर सिंह, मा.आयुक्त, पिं.चिं. मनपा यांनी प्रकल्पांचे तांत्रिक व Financial Model बाबत विभागीय आयुक्त यांना सविस्तर माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणारा सर्व प्रकारचा घनकचरा
विल्हेवाटी बाबत पिंपरी चिंचवड मनपाने एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रणाली (Integrated
Solid Waste Management) कार्यान्वित केली आहे. सदरची व्यवस्थापन प्रणाली
उल्लेखनीयरित्या कार्यान्वित असल्याने राज्यातील तसेच देशातील विविध क्षेत्रातून पिंपरी चिंचवड मनपाचे कौतुक होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर सीएनजी गॅस व सुक्या कचऱ्यावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेनंतर वीज निर्मिती होत आहे. तसेच राडारोडा व्यवस्थापन केंद्र व प्लॅस्टीक टू फ्युएल या प्रकल्पामध्ये बांधकाम साहित्य व फ्युएल (इंधन) निर्मिती होत असल्याने खरोखरच सदर प्रकल्पामध्ये वेस्ट टू वेल्थ संकल्पना प्रभावीपणे राबविणेत पिंपरी चिंचवड मनपास यश आल्या बाबत मा. विभागीय आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड मनपाचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन प्रत्येक शहरात राबवणे आवश्यक असले वावत मत व्यक्त केले.