शबनम न्यूज | पुणे
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे VVPAT मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी हडपसरमधील उमेदवार प्रशांत जगताप यांनी निवडणूक आयोगाकडे तब्बल 12 लाख 74 हजार रुपये भरले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी प्रशांत जगताप यांचा सुमारे 7,000 मतांनी पराभव केला. मतमोजणी वेळी देखील प्रशांत जगताप यांनी फेर मतमोजणी करायला लावली होती. फेर मतमोजणी करून देखील प्रशांत जगताप पराभव झाला होता.
Advertisement