शबनम न्यूज | पुणे
कुशल कामगारांच्या वाढत्या मागणीसाठी कौशल्य वाढवण्यावर केंद्र सरकार काम करत आहे. त्या दृष्टिकोनातून “प्रियदर्शनी स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय” तसेच “आस्था सोशल फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते “कौशल्य विकास केंद्रा”ची स्थापना करण्यात आली.
तरुणांनी आपल्यातील कौशल्य ओळखून रोजगार तसेच स्वयंरोजगार प्राप्त करावा. तसेच जास्तीत जास्त युवक युवतींनी सदर कौशल्य विकास केंद्रात मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. जितेंद्र सिंग यांनी उद्घाटन प्रसंगी केले..
सध्या सुरू होत असलेल्या नर्सिंग असिस्टंट (जी डी ए) कोर्ससाठी सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्टडी किट (वही, पुस्तक, पेन, एप्रोन) डॉ सिंग यांच्या शुभहस्ते वितरित करून सर्वांना नोकरी मिळावी व तुमच्या सर्वांच्या हातून समाजाची सेवा घडावी, अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आस्था सोशल फाउंडेशन चे प्रमुख सौ दीपा शिंदे व श्री हर्षद शिंदे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ फरजाना शेख, सीबीएससी स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ शिल्पी शुक्ला, अकॅडेमीक हेड श्री. हर्षद ताथेड तसेच प्रा. व्ही एस पाटील उपस्थित होते.