शबनम न्यूज | पुणे
श्रीराम ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली तसेच भारतातील आघाडीच्या वित्तीय सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने ‘#TogetherWeSoar’ ही प्रेरणादायी नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. श्रीराम फायनान्सची ही मोहीम, एकतेची शक्ती अधोरेखित करत, महत्त्वाकांक्षी भारतासोबत भागीदारी
करत आहे. आज, अनेक भारतीय “मग, काय?” या संकल्पनेचा स्वीकारत आहेत, जे त्यांच्या यशाच्या प्रवासातील कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची आकांक्षा निर्माण करत आहेत. राहुल द्रविडच्या स्वतःच्या आयुष्याचे काही अंश घेऊन या मोहिमेची सुरुवात केली आ
संदेश स्पष्ट आहे: “एकत्र येऊन आपण भरारी घेऊ शकतो’. आम्ही आमच्या ग्राहकांशी मजबूत नातेसंबंध निर्माण करून, त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देत, त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करतो.
Shriram Finance – #TogetherWeSoar | #JodleJaauyaaUduyaa | (Marathi) – https://youtu.be/qwx4WvuNP-E
मोहिमेला दिग्गज व्यक्तीमत्वाचे पाठबळ
क्रिकेट विश्वात दिग्गज मानले जाणारे राहुल द्रविड हे श्रीराम फायनान्सशी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जुडले असून, टीमवर्कसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम फायनान्सचा या वैशिष्टांना राहुल द्रविड मूर्त रूप देतात.
मोहिमेच्या प्रभावात भर घालत, प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी “हर इंडियन के साथ: जुडेंगे. उडेंगे” या जाहिरात चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला आपला आवाज दिला. ५० हून अधिक वर्षे चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केल्यामुळे, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या मोहिमेसाठी अकादमी पुरस्कार विजेते के. एस. चंद्रबोस यांनी तेलुगु आवृत्तीसाठी आणि तमिळ आवृत्तीसाठी गीतकार मधन कर्की हे गीतकार आहेत.
राष्ट्रव्यापी मोहिम
‘#TogetherWeSoar’ ही मोहीम प्रिंट, डिजिटल, टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि आउटडोअर प्लॅटफॉर्म तसेच भारतभरातील निवडक चित्रपटगृहांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. त्याच बरोबर, श्रीराम फायनान्सने प्रो कबड्डी लीगसोबत भागीदारी केली आहे आणि PKL दरम्यान प्रेक्षक ही जाहिरात पाहतील.
भागीदारीचा अनोखा संदेश
श्रीराम फायनान्सच्या एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर – मार्केटिंग, एलिझाबेथ वेंकटरामन या जाहिरात मोहिमेबद्दल म्हणाल्या, ‘Together, We Soar’ या मोहिमेत आम्ही प्रत्येक भारतीयाच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. ही मोहीम मुदत ठेवी, वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा, लघुउद्योगाला सहाय्य करणे तसेच सुवर्ण अथवा वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून त्वरित निधीचा उपलब्ध करून सामान्य माणसाच्या महत्वाकांक्षेला प्रेरणा देते.”