शबनम न्यूज | बालेवाडी
बालेवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रणजीत भास्कर रोकडे (वय २९, रा. शिवराज बिल्डींग, वृंदावन काॅलनी, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई मनोज दिवे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रणजीत हे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास बालेवाडी परिसरातून निघाले होते. मिटकाॅन स्कूलसमोर नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली.
Advertisement
रणजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रणजीत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.