शबनम न्यूज | बाणेर
बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता, याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. यात पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले. तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक सत्ताउद्दीन मोहम्मद दिलावर हुसेन (वय 22 ,रा.जुनी सांगवी) याच्यासह अन्य एकावर गुन्हा नोंदवला आहे. शहरातील बेकायदा व्यवसाय जुगार, मटका, अड्डे ,मसाज पार्लरच्या नावे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. सदर आदेश धूडकावून बाणेर भागात ‘मुन थाई स्पा’ येथे मसाज च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. बनावट ग्राहक पाठवून खातर जमा केली. त्याचप्रमाणे मून थाई स्पा येथे, धडक कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.