- कुदळवाडीतील कोणत्याही व्यावसायिकाने घाबरण्याची गरज नाही – खा. डॉक्टर अमोल कोल्हे
शबनम न्यूज | कुदळवाडी
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी भागात 15 ते 20 भंगार दुकानांना व गोदामांना आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, सर्वत्र आधीचे धूर पसरले. अनेक गोदामे जळून खाक झाली, अनेक दुकाने जळाली, अतोनात नुकसान झाले. परंतु, या घटनेमध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. महानगरपालिकेच्या तत्परतेने तसेच अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
या दुर्घटनेनंतर कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकान चालक आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे, या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सूचना दिल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी घटनास्थळी कुदळवाडी येथे जाऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत अमोल कोल्हे यांचे पत्र असलेले निवेदन आयुक्तांना दिले. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी नमूद केले आहे की, 15 तारखेला अमोल कोल्हे स्वतः घटनास्थळी भेट देणार असून, संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हा दुर्घटनाग्रस्त व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
तसेच या दुर्घटनेत नुकसान झालेल्या व्यावसायिकांची नुकसान भरपाई व्यापाऱ्यांना सरकारने द्यावी. अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रशासन व महाराष्ट्र सरकार यांना मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी चरचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष इमरान शेख यांनी दिली आहे.
येत्या 15तारखेला खासदार अमोल कोल्हे स्वतः कुदळवाडी येथील नुकसान झालेल्या व्यावसायिकांची भेट घेणार असून, आपण या व्यावसायिकांच्या पाठीशी असून कोणत्याही व्यावसायिकाने घाबरण्याची गरज नाही, असा संदेश खासदार अमोल कोल्हे यांनी दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या व्यावसायिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.