शनिवार,दिनांक 28/12/24 रोजी दुपारी 2 वाजता वाकड,पुणे येथील Millenium Mall च्या बाजूला माझी two Wheeler पार्क केली कारण तेथे बऱ्याच गाड्या पार्क केल्या होत्या.गाडी रस्त्याच्या वरती म्हणजे निळा पत्रा सर्व बाजूंनी होता ,त्या ठिकाणी पार्क केली होती.बाजूला हातगाडी ही होती..ते त्यांचा व्यवसाय करत होते.इतर भरपूर 30 -40 गाड्या होत्या.4 वाजता मॉल मधून बाहेर येवून पाहतो तर गाडी तेथे नव्हती.म्हणून आजूबाजूला चौकशी केली तर म्हणतात आत्ताच 10- 15 मिनिट पूर्वी गाडी येवुन गाड्या घेवून गेल्या.मग,असे लक्षात आले येथे तर अजून इतक्या गाड्या लागल्या मग,ठराविक च गाड्या कशा नेल्या.नियम सगळ्यांना सारखा नसतो का? वाकडं पोलिस चौकीजवळ गाड्या घेवून जातात .तेथील पत्ता विचारत तेथे गेलो.तेथे माझी गाडी दिसली.त्यांना म्हटले तुम्ही गाडी येथे का आणली? तर म्हणतात no parking मध्ये गाडी होती.मग म्हटले मी जेथे गाडी लावली तेथे ही अजून 30-40 गाड्या आहेत..त्या गाड्या का आणल्या नाहीत.शिवाय तेथे एक हातगाडी उभी आहे..तो त्याचा व्यायसाय करतो,तिला कशी परवानगी? ती नाही का नियम बाह्य.गाड्या उचलून नेल्या जातात हे माहीत असते तेथे तर मी गाडी तेथे लावली च नसते.माझ्या गाडीवर अजून ही पावती पडली नव्हती.मग,मी म्हटले सर,मला जर No parking चा board दिसला असता तर मी कशाला गाडी तेथे पार्क केली असती.750 रुपये fine सांगितली मला.माझ्याकडे इतके पैसे नाही म्हटले..म्हणजे पैसे नव्हतेच ….500 रुपये ठेवले होती मुलीला खरेदी करण्यासाठी तर ते त्यांनी घेतले.त्या रकमेची पावती दिलीच नाही.No parking मध्ये गाड्या लागतात मग त्यांना किती fine असते. 200 रुपये ना? मग कोणत्या नियमाने त्यांनी माझ्या कडून 500 रुपये घेतले.किती भ्रष्टाचार आहे आपल्या भारत या देशात..तेच समजत नाही.नियम सगळीकडे तर कधीच सारखे नसतात.सिग्नल वर जशी ऑनलाईन पावती कट होते ना तशी No parkjing मध्ये गाडी लावली की पैसे कट झाली पाहिजे? म्हणजे सरकार ल भरपूर पैसे मिळतील..लोक कडक शिस्तीचे पालन करतील …माझ्या सारख्या चुका करणार नाही? आणि या सिस्टीम मधील लोक असे पैसे खाणार नाही? असे रोज किती लोकांना हे लुटत असतील…किती भ्रष्टाचार फोफाळला.काय मिळणार असे करून? असे दुसऱ्यांच्या कमाईचे पैसे किती दिवस पुरतील.एकाला एक नियम व दुसऱ्यांना एक नियम असे करून काय मिळविणार? तेथे मग,एक ही गाडी दिसायला नको? जेथे मी गाडी पार्क केली होती तेथे?
नियम सगळ्यांना सारखे करा? काहीच अडचण नाही…कारण सगळे जण त्या त्या वेळी त्या त्या जागेचा वापर करत असतात. आणि या पेक्षा ही best solution म्हणजे No parkiing मध्ये जी भी गाडी पार्क होईल तिची ऑनलाईन पावती कट करावी.तुम्ही कोणीही आता ही जा तेथे गाड्या अजून त्या जागी रोज किती पार्क होत असतील. मग,या गाडी तेथे हजर का नसतात? या गाड्या ओढून आणायला.किती कमाई होईल या लोकांची.आमच्या सारख्या लोकांना शिस्त ही लागेल ना? पावती ही दिली नाही त्यांनी माझ्या पैशाची,म्हणजे याचा अर्थ काय तर पैसे त्या ठराविक लोकांच्या खिशात गेले.खाल्ले माझे पैसे….मला नियम शिकवून स्वतः च माझे पैसे खाल्ले? असे चालते का? किती दिवस असे चालणार? हद्द झाली भ्रष्ट कारभाराची.बऱ्याच जणांना असा आयता पैसा खायला फार आवडतो? पण,हा पैसा फार काळ टिकणार नाही हे ही त्यांना समजत नाही…3 वेळा समज द्यावी..आणि तरी चूक केली तर फाईन करा..आणि रीतसर पावती फाडा.एकीकडून पगाराचे पैसे मिळतात आणि हा दुसरा side buisness ही चालू असतो.अशी वरची रोजची कमाई…..यातच खुश होत असतील.पण,ज्यांचे पैसे जातात त्यांची किती हाय लागत असेल याचा ते कधी विचार करत नाही.जाणून बुजून कोणी शिकार होत नाही?वाघाच्या जबड्यात हात घालत नाही.
99% लोक म्हणतात तुम्ही तुमच्या पुर्ते बोला,तुम्ही तुमचे पहा..इतरांना मध्ये नका आणु.म्हणजे नेमके काय? तेच मला समजत नाही.येथे चेहरे पाहून व्यवहार केले जातात.ठराविक लोकच बळीचा बकरा बनतात…बाकी मस्त…माझ्या वर नाही आली वेळ..तू तुझे पहा.किती माणुसकी? खरचं ही माणसे का?भ्रष्टाचारलख आपणच खतपाणी घालतो.पैसे दिले का सारे कसे शांत,अलबेल असते.कोणाला काही त्रास नसतो?
मला घरी जाण्यासाठी खर्चाला तरी माझ्याच पैशातील जे गुपचूप तुमच्या खिशात गेले त्यातील 100 – 200 रुपये द्या म्हटले तर …एक जण चांगला च भडकला…. ओ मॅडम गाडी लावा..आणि जा….पैसे भरा मग गाडी घेवून जा?म्हणजे काय ओ असे मी परत विचारले तेव्हा म्हणतात… असे असते का? माझ्या समोर एका माणसाकडे गुपचूप किती रुपये घेतले ते मला दिसले नाही..त्यांना बाजूला नेवून पैसे घेतले? अन् माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते..जे 500 रुपये होते ते लगेच खिशात पैसे घातले? काय समजू मी? समजते सारे? मी महिला म्हणून तुम्हाला जास्त बोलता येत नाही .म्हणून धमकी देतात का? पोलिस पासून वाचवले म्हणतात? म्हणजे काय वाचवले तेच समजेना? माझ्या वरून दोघांची भांडणे सुरू झाली.मी तेव्हा चुकले फेस बुक live करायला हवे होते .आपला पैसा,असा फुकट कोणाच्या घशात/ खिशात/ पोटात जातो ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आयते पैसे खायची सवय कधी बंद होणार? रीतसर पावती ही देत नाही? सगळ्यांना सारखे नियम ही करत नाही? वाटेल तेव्हा जायचे,वाटेल तेथील,वाटेल तेव्हढ्याच गाड्या उचलून आणायच्या…किती बकरे ताब्यात सापडतात तेवढे घ्यायचे आणि पैशांनी कापायचे.जितके भेटतील तितके घ्यायचे? आणि वर कमाईने खिसा भरायचा.
सरकारला प्रश्न हे किती दिवस चालणार? No parking जेथे असेल ना तेथे गाडी पार्क होताच ऑनलाईन पैसे कट करा.असे,फुकटचे पैसे घेवून काही फायदा तुमचा होणार नाही? नुकसान मात्र आमचे होणार? मानसिक,शारीरिक त्रास ही तो ही आम्हाला च होणार? यात तुमचे काय जाते? जाईल आज ना उद्या.हे नेहमी लक्षात ठेवा.असे व्यवहार कोठे तरी थांबले पाहिजे.असे मला मनापासून वाटते…म्हणजे मला ही शिस्त लागेल? आधी सगळीकडे पाहून घ्यायचे No parkiing असा बोर्ड तर नाही ना? मग गाडी पार्क करणे. बाकी गाड्या पार्क झाल्या म्हणून काय बिघडले? मी माझ्यापुरता विचार केलेला बरा…. कारण येथे नियम नेहमी बदलतात…प्रत्येकांसाठी नियम वेगळे असतात.माणूस पाहून नियम बदलले जातात?
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,44