शबनम न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे, ता. ३१ : येथे भाजी कापण्याच्या चाकूने एकाच्या कपाळावर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच यामधून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कौशलकुमार ठाकूर (वय २५, रा. महिंद्रा कंपनी, गेट न. २ निघोजे, पुणे) यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संतोष धांडे (वय २८) , कृष्णा धांडे (वय २० ) दोघांना अटक करण्यात आली आहे.
Advertisement
तसेच अल्पवयीन मुलगा सौरभ हरिजन (वय १७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत रस्त्यावर बोलत थांबले असताना आरोपीने ‘काय बडबड लावली आहे? तुम्ही टोळी करून काय बेत करत आहेत?
असे म्हणत फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
Advertisement