शबनम न्यूज : प्रतिनिधी
थेरगाव , ता. ३१ : वाकड मध्ये अल्पवयीन मुलाने कुटुंबात सुरु असलेल्या भांडणातून भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या शेजारी यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी मीराबाई बोरसे ( वय ५५ ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
कुटुंबात सुरु असलेले भांडण मिटविण्यासाठी आलेल्या शेजारी यांच्या सुनेसोबत अल्पवयीन मुलाने गैरप्रकार केला तसेच फिर्यादी महिला यांना मारहाण करीत त्यांचा मुलगा संजय यास देखील मारहाण केली. याबाबत अधिक तपस वाकड पोलीस करीत आहेत.