शबनम न्यूज : प्रतिनिधी
रहाटणी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बी आर टी ऐस मार्गावरील पी के चौक येथे नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या मार्गावर हिंजवडी, वाकड, पुणे येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांसाठी हा सोपा मार्ग असल्याने या मार्गाचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच जवळ असणार्या भोसरी, चाकण, खेड औद्योगिक परिसरातील मोठे मालवाहतूक करणारी वाहने देखील या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यामुळे पी के चौक येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते आणि यामुळे आत्ता पर्यंत अनेक छोटे मोठे अपघात या चौकात झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामधून सुटका होण्यासाठी म्हणून माजी नगरसेवक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधीपक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शिंह यांना उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र दिले.या प्रसंगी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप उपस्थित होते..
तसेच प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्र. ३६१ मधील गार्डन वापराचे आरक्षण बदलून त्या जागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार करावा या बद्दल चे पत्र या वेळी दिले जेणेकरून या उपक्रमाचा फायदा पिंपळे सौदागर येथील २३० हून अधिक निवासी सोसायट्यांना होईल.
त्याच बरोबर दिवसेंदिवस महानगरपालिकेतील हॉस्पिटल मध्ये वाढणाऱ्या ICU व NICU बेडची मागणी लक्षात घेता सर्व महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधील बेडची संख्या वाढवण्यासाठी पत्र दिले जेणेकारीण उत्तम सेवेपासून मुकणाऱ्या आर्थिक दुर्बल व गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येईल.
यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले