शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, (आळंदी), पुणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून “सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य”या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व आरती व प्रतीक्षा यादव यांचे स्वागत गीताने झाली झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उद्देश व भूमिका स्पष्ट केली.
या व्याख्यानाच्या व्याख्यात्या डॉ.श्रेया दाणी, इतिहास विभाग प्रमुख राजमाता महाविद्यालय,भोसरी यांनी सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्रीवादाच्या जननी असून त्यांच्या स्त्री शिक्षणाचा खरा उद्देश मुलींचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढेच न राहता मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कार्यकर्तत्व निर्माण करून अन्याय व अत्याचाराला शिक्षणाच्या माध्यमातून प्रतिकार केला पाहिजे हा होता.एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो याची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी मुलींच्या शिक्षणाची पहिली क्रांतीज्योत पुण्यातील भिडे वाड्यात पेटविली आणि त्याचाच परिणाम म्हणून पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख व धर्माची समीक्षा करणारी मुक्ता साळवे या सारख्या विद्यार्थिनी तयार झाल्या. सावित्रीबाई फुले ह्या उत्तम लेखिका, कवयित्री व समाज सुधारक होत्या म्हणून त्यांच्या जन्मदिनी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयीन तरुणींनी क्रांतीज्योती सावित्रीचा आदर्श घेऊन भावी आयुष्यात त्यांच्यासारखे कार्य करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य समाजापर्यंत कशी नेली या संदर्भात सविस्तर विवेचन करून जोपर्यंत समाजात अज्ञान असते तोपर्यंत निरंतर शोषण केले जाते त्यासाठी शिक्षण कसे परिवर्तनाचे साधन आहे या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले तसेच आधुनिक काळात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची अपेक्षा महाविद्यालयीन तरुणाईकडून व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ.पांडुरंग मिसाळ- मराठी विभाग प्रमुख, प्रा.माणिक कसाब राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री प्रवीण भावे, कार्यालयीन अधीक्षक ,प्रा. प्रफुल्ल जाधव- बी. बी.ए.सी.ए.विभाग प्रमुख प्रा. रोहित कांबळे- इंग्रजी विभाग प्रमुख,प्रा. डॉ. संतोष कदम, प्रा. डॉ. देवानंद गोरडवार,प्रा.यशोदा आनेराव, प्रा. दिपाली ताम्हाणे- वाणिज्य विभाग प्रमुख,प्रा.दिपाली सोनवणे,प्रा. महेश म्हसागर, प्रा.प्रभाकर गायकवाड,प्रा.पूजा खवले,प्रा.कविता मोरे,,प्रा.रूपाली औटे, प्रा. पूजा खेडकर, प्रा. प्रतिभा गुंड,प्रा. सुजाता गिरी, सौ.वर्षा ताजणे,सौ.नेहा लांडगे,श्री सचिन गावडे व सौ. तेजल चव्हाण, श्री वैभव बडवे व श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे- अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सविता मानके – भूगोल विभाग प्रमुख यांनी मानले.सदरील कार्यक्रमाचे सांगता सामूहिक पसायदानाने झाली.