शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील विकास नगर, दत्तनगर, भीमाशंकर नगर, किवळे,साईनगर ,मामुर्डी ,या भागातील भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधील विकास नगर, दत्तनगर, भीमाशंकर नगर, किवळे, साईनगर ,मामुर्डी या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रभागातील बरेच नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. तसेच या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांसोबत अपघात होऊ शकतो. याकरिता या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
जर आपण पंधरा दिवसाच्या आत या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही अन्यथा हे कुत्रे पकडून महापालिका आवारात सोडून देऊ असा इशारा देखील राजेंद्र तरस यांनी निवेदनाद्वारे केला आहे.