शबनम न्यूज | पिंपरी
महापालिकेस २०२५ या नव्या वर्षांत तब्बल २५ सार्वजनिक सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या दिवशी महापालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद असणार आहे. या सुट्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या रजेचे नियोजन करता येणार आहे. जानेवारी, जून व जुलै तसेच, सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रत्येकी एकच सार्वजनिक सुटी आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उपविभाग, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेद्वारे २०२५ मधील सार्वजनिक सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात फेब्रुवारी महिन्यात २, मार्चमध्ये ३, एप्रिलमध्ये ४, मे महिन्यात २ सुटी आहेत. ऑगस्टमध्ये ३, ऑक्टोबर महिन्यात ५ सार्वजनिक सुटी आहेत.
तसेच, दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी महापालिकेस साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे महापालिकेचे कामकाज बंद असते. या २५ सार्वजनिक सुट्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. तसे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले आहे.
दरम्यान २६ जानेवारीची सुटी रविवारी आली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सुटीदिवशी कार्यालयात यावे लागणार आहे.