शबनम न्यूज | चिंचवड
पिंपरी चिंचवड शिवसेना शहर संघटिका सरिता अरुण साने यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठे आय नेटवर्क, ईशा नेत्रालय यांच्यावतीने निशुल्क नेत्र तपासणी शिबिर संपन्न होत आहे.
सदर शिबिर रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 तसेच रविवारी सकाळी 9ते दुपारी 2आणि गुरुवारी बंद यादरम्यान, मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. प्रीमियर प्लाझा बिग बाजार, पहिला मजला, कार्निवल सिनेमा च्या बाजूला, जुना मुंबई-पुणे हायवे चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड येथे सदर मोफत नेत्र तपासणी शिबीर होणार आहे.
सदर शिबिरात सर्व प्रकारच्या मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तरी या निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरिता अरुण साने यांच्या वतीने करण्यात आले आहे.