शबनम न्यूज | पिंपरी
अवजड वाहनांना थरमॅक्स चौक ते चिखली रस्त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या वाहतूक व नियंत्रण विभाग, पोलीस उपायुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे कि, निगडी वाहतूक विभाग व तळवडे वाहतूक विभाग यांनी सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत जड वाहतुकीसाठी आकुर्डी चिखली रोड हा बंद केलेला असून देखील मोठ्या प्रमाणावरती रोडवरती डंपर, ट्रक मालवाहतूक गाड्या, ह्या भरधाव वेगाने धावताना दिसत आहेत. वाहतूक प्रशासनाचे नियम धाब्यावरती बसवून ही वाहतूक सरासपणे होताना दिसत आहे. या वाहतुकीमुळे सर्वसामान्यांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो व भविष्यात या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे.
या रस्त्या वरती मोठी बाजार पेठ,कामगार वर्ग,हॉस्पिटल,शाळेत येणारे जाणारे विद्यार्थी,कामगार नाका,तसेच अत्यवश्यक असलेले ऍम्ब्युलंस,अग्निशानक गाड्या ये -जा असतात. परंतु जड वाहनामुळे वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे आत्यवश्यक सेवा पोहचण्यास विलंब होतो तसेच अपघात देखील मोठ्या प्रमाणात घडतात यामुळे नागरिकांना अवजड वाहनामुळे व ट्राफिक मुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी ही जड वाहनावरती बंदी असताना पोलिचे प्रशासन व वाहतूक नियमाचे नियम ध्याब्यावर वर ठेऊन जड वाहने धावत आहे. या मुळे अशा वाहना वरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.