शबनम न्यूज | पुणे
फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे पर्व संपन्न झाले. ५ जानेवारी २०२५ मॅरेथॉन धावपट्टू व फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन या कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर होते. यांच्या सह अभूतपूर्व असा उत्साह अनुभवला. सबंध पंचक्रोशितील धावपट्टूंना एकत्र आणून या कार्यक्रमाने पुण्याच्या क्रिडा जगतात विशेष स्थान मिळविले आहे. पुण्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये पराक्रमी धावपट्टूंनी विशेष उल्लेखनीय अशा धावांची नव्याने नोंद केली आहे.
भारताच्या केंद्रभूत स्पर्धा ठरणाऱ्या वार्षिक मॅरेथॉन मध्ये फुल मॅरेथॉन (४२.२ की.मी), हाफ मॅरेथॉन (२१.१ की.मी), १०,००० आणि ५००० फन रन यांच्या समावेश असतो. ज्या माध्यमातून विविध क्षमतेच्या व वयोगटाच्या लोकांचा सामवेश होऊ शकतो.
उत्तम अशा वातावरणात सकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सुरू झाला. पुण्याच्या सांसृतिक व ऐतिहासिक वतनवारसा व शहराच्या मुख्य खुणा स्पष्टपणे निदर्शनात येतील अशा पूर्व नियोजित पटावरून काहीशी आव्हानात्मक तसेच काहीशी गंमतशीर धाव आखण्यात अली होती.
कार्यक्रमाचा चेहरा असलेल्या मिलिंद सोमण यांनी फक्त ब्रँड एम्बेसडर म्हणूनच काम न पाहता खऱ्यार्थाने सर्व वयोगटातील लोकांना शारीरिक स्वास्थ्यासंबंधी प्रेरित केले व स्पर्धकांना देखील काही प्रश्न विचारून उत्साही ठेवले.
तसेच त्यांच्या असण्याने या कार्यक्रमाचा मुख्य हेतू सामूहिक स्वास्थ्य आणि ऐक्टिव लिविंगला याला विशेष अर्थ प्राप्त झाला.