शबनम न्यूज | नाशिक
पत्रकार दिनाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर संघ नाशिक यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो या वर्षीचा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार पिंपरी-चिंचवड येथिल पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले यांना राजकिय, सामाजिक ,कला व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारासाठी निवड केल्याचे नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष डाॅ महेंद्र देशपांडे यांनी अनिल वडघुले यांची निवड केल्याचे कळविले होते.
हा पुरस्कार वितरण समारंभ पत्रकार दिनानिमित्त सि बी एससी सभागृह नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी दै सामना चे संपादक सुरत चे मनोज शिंदे, झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, गुणवंत कामगार कल्याण मंडळ अध्यक्षा भारती चव्हाण, अनेक उद्योग पति व मान्यवर उपस्थित होते.