शबनम न्यूज | पिंपरी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात 6 जानेवारी 1832 मध्ये केली. हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू गोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सायली कुलकर्णी, उपाध्यक्ष रेहान सय्यद, सचिव संतोष जराड, पत्रकार शबनम सय्यद व पत्रकार श्रद्धा प्रभुणे यांच्यासह पत्रकार अनिल वडघुले पत्रकार रामकुमार शेडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
Advertisement