शबनम न्यूज | पिंपरी
दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी दोहा कतार येथे झालेल्या आशियाई सिलंबम स्पर्धेमध्ये महराष्ट्रातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील मलेशिया, दुबई, भारत, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, कतार, सऊदी अरेबिया या देशातील खेळाडू सहभागी झाले होते.
यामध्ये भारतीय संघाकडून मुलांच्या गटात सूरज बांगर १४ वर्षाखालील वयोगट काठी फिरविणे या खेळ प्रकारा मध्ये सुवर्ण पदक आणि काठीची लढत मध्ये रौप्य पदक मिळविले. केतन नवले खुला वयोगट काठी फिरविणे खेळ प्रकार रौप्य पदक आणि कठीची लढत मध्ये कांस्य पदक मिळविले.
मुलींच्या गटात रिद्धीका पाटील १२ वर्षाखालील वयोगट काठी फिरविणे खेळ प्रकार रौप्य पदक आणि काठीची लढत मध्ये रौप्य पदक मिळवले. श्रेया दंडे १८ वर्षाखालील वयोगट काठी फिरविणे खेळ प्रकारात रौप्य पदक आणि काठीची लढत मध्ये रौप्य पदक मिळविले. असे महाराष्ट्र संघा कडून एकूण १ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवल.
सर्व विजयी खेळाडूं सोबत मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट्स अध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रतिनिधि म्हणून कामगिरी बजावली.
या उल्लेखनीय यशाबद्दल कतार देशामधील इंडियन कल्चरल सेंटर कतार, महाराष्ट्र मंडळ कतार, परराष्ट्र मंत्रालय कतार यांच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. इंडियन कल्चरल सेंटरचे अध्यक्ष मनीकांतन ए. पी. महाराष्ट्र मंडळ कतार चे अध्यक्ष राकेश वाघ, उपाध्यक्षा सौ. रचना चौधरी, सल्लागार चिराग घोष, सदस्य सिद्धेश झेंडे, विद्या मोगरे यांनी त्यांच्या कतार येथील कार्यालयात खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि अभिनंदन केले.
तसेच महाराष्ट्र राज्यात विजयी खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी किरण अडागळे, स्मिता धिवार, अभय नवले, रविराज चखाले, गणेश गेजगे, अजय नवले तसेच सर्व पालक वर्ग उपस्थितीत होते.