शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्या वतीने शहरात काही बस थांबे निश्चित केले असताना काही बस चालक व ट्रॅव्हल्स चालक आपली वाहने कोठेही थांबवतात व ही वाहने अपघाताला निमंत्रण देतात, त्यामुळे अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड व पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, तळवडे, चिखली, भोसरी परिसरातून अनेक ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करत असतात, ते करत असताना ठरवून दिलेल्या बस थांब्यावर ही पाहणे थांबत नाही. ही वाहने शहरात कोठेही थांबतात, त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्यामुळे अनेक अपघाती होतात, काही महिन्यापूर्वीच वाहतूक विभागाने बस व ट्रॅव्हल स्पीकर आणि ड्रॉप निश्चित केले आहे होते. तरी ट्रॅव्हल्स व बस चालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कोठेही बस थांबवत असतात त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे या वाहनांवर त्वरित कारवाई करावी ,अशी मागणी विनोद वरखडे यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.