शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी मधील नागरिकांच्या सोयीसाठी चिखली पोलीस स्टेशन हद्द लागू करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी हा परिसर येत असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, मंदिरे, क्रीडांगणे ,उद्याने ,बीआरटीएस रोड ,बर्ड व्हॅली तसेच औद्योगिक क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते,. येथे नागरिकांच्या पोलीस विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या व अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात . उदाहरणार्थ भरधाव वेगाने कर्कश आवाजाने दुचाकी चालविणे, महिला भगिनींच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन जाणे, काही टोळक्यांच्या माध्यमातून मारामाऱ्या होणे असे प्रकार दुर्दैवाने घडत असतात, त्यामुळे शाहूनगर वासियांना काही समस्या उद्भवली तर त्यांना पाच किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर असलेले एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठावे लागते, तसेच संभाजीनगर मधील रहिवाशी यांना निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत यमुनानगर पोलीस चौकीची हद्द असल्यामुळे त्यांना तब्बल चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा लागतो, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे , याकरिता चिखली पोलीस स्टेशन हे फक्त पाचशे मीटर अंतर असलेले पोलीस स्टेशन असल्याने या पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभाग क्रमांक दहा मधील शाहूनगर, संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनची हद्द लागू करण्यात यावी. तसेच पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडे प्रस्ताव देऊन, सदर कामासाठी पाहणी करून,अंतर मोजून अगदी हाताच्या अंतरावर असलेले चिखली पोलीस स्टेशनची हद्द तात्काळ लागू करून नागरिकांची व त्यांच्या समस्यांची होणारी गैरसोय थांबवावी लवकरात लवकर चिखली पोलीस स्टेशन लागू करण्याचे आदेश आपल्या विभागामार्फत देण्यात यावे अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी केली आहे.