शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील गुरुद्वारा , वाल्हेकरवाडी , चिंचवड या परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस ( पाईप नॅचरल गॅस) लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवानेते सुरज गजानन बाबर यांनी केंद्रीय मंत्री , पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस, सचिव, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस ,भारत सरकार, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांच्याकडे गुरुद्वारा वाल्हेकर वाडी परिसरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीची , पाईप नॅचरल गॅस ची लाईन टाकून मिळणेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत याबाबत दिनांक आठ जुलै 2024 रोजी माननीय सुनील पाटील साहेब असिस्टंट मॅनेजर, पीएनजी प्रोजेक्ट यांनी सदर प्रकरणे महानगरपालिकेकडे दिले आहे असे सांगितले , व महानगरपालिका पावसाळ्यामध्ये रस्ता खोदू देत नाही असेही सांगितले ,माननीय सुनील पाटीलजी सप्टेंबर महिना गेला आता नवीन वर्षातील जानेवारी महिना उजाडला आहे तरी कोणतीही कार्यवाही आपल्या मार्फत झालेली दिसून येत नाही किंवा आम्हाला आपणा द्वारे कळविण्यात आलेले नाही तरी ताबडतोब आपण महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यात यावी व महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची पाईप नॅचरल गॅस लाईन टाकून देण्यात यावी आपणास जर कोणतीही अडचण परवानगी मिळणे कामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून होत असेल तर आपण माननीय श्री शेखर सिंग साहेब आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना तात्काळ भेटावे व तशा आशयाचे पत्र आपण देण्यात यावे, असे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच अधिकाऱ्यांकडून कामांमध्ये दिरंगाई होत आहे, आपण या प्रकरणी लक्ष घालून तशा सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.