शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड : जम्मू-कश्मीर येथे एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा व सुझुकी वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेतर्फे ८ खेळाडूंची निवड झाली आहे. याच ८ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.
तसेच, या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी हर्षद कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
या विशेष संधीचे औचित्य साधून, हेवन जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या वतीने या ८ खेळाडूंचा व हर्षद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार, सहखजिनदार दीपक सूनारिया, हेवन जिम्नॅस्टिकचे माजी प्रशिक्षक सौ.अलका तापकीर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी व आश्लेषा डहाके यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू अनवी पाटील हिने केले, तर खेळाडूंची माहिती व आभारप्रदर्शन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार श्री.बारणे,श्री.फूलतांबकर व सौ.पटेल या खेळाडूंच्या पालकांनी केला.
खेळाडूंनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने संपूर्ण कार्यक्रमात उर्जा निर्माण झाली होती. पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे:
खुला गट (वैयक्तिक महिला प्रकार):
वृंदा सुतार
१७ वर्षांखालील गट (वैयक्तिक महिला प्रकार):
परीजा क्षीरसागर
१४ वर्षांखालील गट (तिहेरी प्रकार):
सानवी पाटील
धानी पटेल
ईश्वरी कंठागळे
११ वर्षांखालील गट (वैयक्तिक महिला प्रकार):
राही फुलतांबकर
तिहेरी प्रकार:
सिद्धी मारे
इष्टी भटनागर
राही फुलतांबकर