नितेश राणे यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीचे भान राखण्याचे आदेश देण्याची महायुतीच्या नेत्यांकडे
केली मागणी
शिवसेना नेते इरफान सय्यद यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती पत्र..
शबनम न्यूज : पिंपरी
” Every Vote Against Mulla ” असे वक्तव्य काल सांगली येथे एका भाषणात कॅबिनेट मंत्री नितेश राणें यांनी केले. राणेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सर्व मुस्लिम समाज बांधव यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महायुतीच्या सोबत मोठ्या संख्येने उभे असून सुद्धा सरकार मधील एक जबाबदार कॅबिनेट मंत्री घाणेरडी मानसिकता घेऊन विशिष्ठ समाजाबद्दल असे वक्तव्य करीत असेल तर ते अशोभनीय आहे. कॅबिनेट दर्जाचे पदाला एक सन्मान आहे त्याच्या मर्यादा पाळणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री नितेश राणे यांना महायुतीचे मुख्यनेते यांनी समाज भावना दुखावल्या जातील असे चुकीचे वक्तव्य करू नये याबाबत समज द्यावी अशी मागणी इरफान सय्यद यांनी केली आहे.
सय्यद यांनी मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारे महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशादर्शक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्व समाज बांधव हा मोठ्या संख्येने महायुतीच्या सोबत उभा राहिला असल्याने महाराष्ट्र राज्यात भाजपा , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्याला सर्व समाज बांधवाच्या सोबतच मुस्लिम समाज बांधव यांचे पण योगदान आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.नितेश राणे हे गेल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजाबद्दल आपल्या भाषणातून चुकीचे वक्तव्य करत आहे. आज सांगली येथील एका भाषणात त्यांनी EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला असे चुकीचे वक्तव्य करून सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. आज राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहेत आणि त्याच युती सरकारच्या मंत्री मंडळातील एक जबाबदार असलेल्या मंत्री महोदय यांनी असे चुकीचे एखाद्या समाजाबद्दल असे बोलणे हे अशोभनीय आहे.
आज मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने महायुतीच्या सोबत उभा आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या वक्तव्यामुळे समाज भावना दुखावल्या जात आहे. कॅबिनेट दर्जाचे पदाला एक सन्मान आहे त्याच्या मर्यादा पाळणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री नितेश राणे यांना महायुतीचे मुख्य नेते यांनी समाज भावना दुखावल्या जातील असे चुकीचे वक्तव्य करू नये याबाबत समज द्यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.