शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्यसैनिक,प्रखर देशभक्त तर होतेच तसेच ते साधेपणा, नम्रता आणि सचोटीसाठीही ओळखले जातात,त्यांनी भारताच्या सैनिक आणि शेतक-यांसाठी “जय जवान जय किसान” या क्रांतिकारी घोषवाक्याची घोषणा केली होती शिवाय त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन देशासाठी महत्त्वपूर्ण योगदानही दिले होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा निरीक्षक सुनिल चौधरी, धनाजी माळवदकर, तसेच चेतन वाकडे, अजय भोसले, संजय शिंदे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.