शबनम न्यूज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघात विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तींचे पत्रांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्षपदी संतोष शिंदे, सरचिटणीस दत्ता साबळे, चिटणीस माणिक देशमुख, विकास माचूत्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष रघुनाथ भिसे, सुशांत ढमढेरे, अमोल पोतदार, राजेंद्र जाधवर, मिनहाज शेख, शिवम इभाड, ओंकार बिबवे, पार्थ मिटकरी, सनी मुळे, आदि यावेळी उपस्थित होते.
Advertisement