शबनम न्यूज | आढले बुद्रुक
जिल्हा परिषद शाळा डोणे, केंद्र आढले बुद्रुक, ता. मावळ जिल्हा पुणे येथील विद्यार्थिनी समृद्धी गणेश खिलारी हिने पुणे जिल्हा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये लांब उडी मोठा गट या प्रकारामध्ये पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.
शाळा व्यवस्थापन समिती डोणे, समस्त ग्रामस्थ डोणे, सरपंच, उपसरपंच, शाळेचे मुख्याध्यापक ठाकर सर, क्रीडा मार्गदर्शक कारभारी शिंदे सर, सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व एकता प्रतिष्ठान डोणेचे संस्थापक बाळासाहेब घारेपाटील यांच्यावतीने सुद्धा समृद्धी गणेश खिलारी हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Advertisement