शबनम न्यूज | दापोडी
आज स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजना समितीचे संजय मराठे व नागरिकांकडून पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी संजय मराठे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे झाला.त्यांचे मूळ नाव नरेंरनाथ दत्त होते.लहानपणा पासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जिज्ञासू होते. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपले जीवन मानवसेवेसाठी समर्पित केले.
स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.त्यांच्या प्रभावी भाषणाने पाश्चात्त्य जगाला भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली.त्यांनी ‘शिकागो भाषण’ गाजवले आणि भारताची मान जगात उंचावली.
स्वामी विवेकानंदांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.त्यांनी तरुणांना ‘उठा,जागे व्हा आणि ध्येय प्राप्त करेपर्यत थांबू नका’ असा संदेश दिला.त्यांचा ‘आत्मविश्वास’ आणि ‘निर्भयता’ यावर खूप भर होता.
आजच्या तरुणांसाठी स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.त्यांनी ‘सेवां, ‘त्याग
आणि ‘समर्पण” या मूल्यांचा पुरस्कार केला,तरुणांनी आपल्या देशाच्या आणि समाजाच्या
विकासासाठी योगदान द्यावे,असे त्यांचे मत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजना समितीचे संजय मराठे,भाजप मंडल उपाध्यक्ष ललित म्हसेकर,झी मराठी फेमचे सचिन काटे,भाजी मंडई उपाध्यक्ष कुणाल धिवार,बिभीषण धोदाड,विजय रणसिंग,प्रल्हाद भोयर,आयान शेख,स्वीटी तिवारी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.