शबनम न्यूज | पिंपरी
सध्याचे प्लास्टिक जमिनीत कुजत आणि जमिनीत विघटित होत नाही. त्यामुळे धोकाधायक आहे. मात्र तेच प्लास्टिक योग्यरित्या हाताळले किंवा योग्य विल्हेवाट लावल्यास पर्यावरणाला धोका होणार नाही. पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी सशोधकांनी शेतातील पाला पाचोळा,पाचट,अनावश्यक कचरा यापासून जमिनीत कुजणाऱ्या प्लास्टिकचा शोध लावलाय आहे. मात्र ते प्लास्टिक महाग असल्याने सर्वसामान्य नागरिक वापरू शकत नाही. शाशवत विकासासाठी कंपोस्ट होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करणे काळाची गरज आहे. असा सूर प्लास्टिक क्षेत्रातीलमधील तज्ञ मंडळींनी बायोडिग्रेडेबल प्लास्टिक : आव्हाने आणि संधी या विषयीच्या चर्चासत्रात काढला.
प्रमोशन फॉर प्लास्टिक्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टो प्रदर्शनात चर्चा सत्र संपन्न झाले.
यावेळी स्काय कंपनीचे डॉ सचिन जैन,प्राज इंडस्ट्रीजचे डॉ प्रमोद कुंभार, लॅबचे संचालक डॉ हर्ष जाडिया, नॅशनल केमिकल लॅबचे शास्त्रज्ञ डॉ परेश ढेपे, ज्येष्ठ संशोधक डॉ हर्षवर्धन पोळ सहभागी झाले होते.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन व आभार डॉ हर्षवर्धन पोळ यांनी मानले.
यावेळी वाहन उद्योगतील प्लास्टिक आणि पर्यावरणावर परिणाम या विषयावर डॉ समीर जोशी आणि सारंग आंबडकर यांनी मार्गदर्शन केले. तर प्लास्टिक रिसयालिंग आणि सस्टनेब्लीटी या विषयावर हर्षद बोर्डे, डॉ मेधा ताडपत्रिकर, स्वपन रे, श्रीनिवास आढे, व्हिएसआर नारायणन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी असोशिएशन फॉर दि प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सचे अध्यक्ष अनिल नाईक,प्लास्टो 2025 चे अध्यक्ष अजय झोड,संयुक्त अध्यक्ष निलेश पटेल,सचिव समीर कोठारी, उपाध्यक्ष एन शंकरामन,खजिनदार प्रणव बेल्हेकर, ऍडमिन आनंद कुंभोजकर, सदस्य राज मिर्जे, गोपाळ ढगे, संजय मेहरे आदी मान्यवर उपस्थित होते.