शबनम न्यूज | वाकड
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंद झाल्यानंतर दहा तासांच्या आत फसवणूक करून गेलेल्या आरोपीस मुद्देमालासह वाकड पोलिसांनी अटक केली आहे. सतीश शिंदे (वय २५, रा.बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या येथे चालकाची नोकरी करीत होता,फिर्यादी यांनी आरोपी सतीश कडे विश्वासाने टाटा कंपनीचा टेम्पो चालवण्यासाठी दिला होता. सतीश ने फिर्यादी यांची फसवणूक करून तो टेम्पो पळवून नेला. याची तक्रार वाकड पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर दहा तासांच्या आत फसवणूक करून गेलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन लाखांचा टेम्पो हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस ,सहा.आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती कोल्हटकर, सुभाष चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, बिभीषण कन्हेकर, संदीप गवारी, वंदू गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौतेय खराडे, सौदागर लामतुरे ,तात्यासाहेब शिंदे, नामदेव वाडेकर ,विजय भुसारे ,सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दीपक साबळे, मंगेश लोखंडे यांनी केली.