शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 6 चैन चोरीचे व वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून एकूण 7 लाख 74 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आकाश वजीर नानावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे इतर तीन नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे चैन चोरीचे सहा गुन्हे तर वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आकाश याच्याकडून 84 ग्रॅम 980 ml वजनाचे सोन्याचे दागिने व 3 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे ,सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढमाळ, अभिनय पवार,भरत गोसावी, महेश खांडे, औदुंबर रोंगे, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, प्रवीण कांबळे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे ,प्रशांत पाटील, पोलीस हवालदार गडदे, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर ,बाबाराजे मुंडे, समीर रासकर ,अमर कदम ,हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन अत्तर, मारुती जायभाय यांनी केली.