शबनम न्यूज | भोसरी
‘परत पैसे मागितले तर तुला बघून घेईल’, अशी धमकी देत एकाने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना 12 जानेवारी 2025 रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली.
याप्रकरणी अमित महादेव घाटे (वय 36, रा. खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर कुमार काटे (वय 36) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला हात उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण करून तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारले असल्याने फिर्यादी हे गंभीर जखमी झाले, तसेच परत पैसे मागितले तर तुला बघून घेतो, अशी धमकी देत मारहाण केली. या घटनेत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहे. याबाबत अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.