निःस्वार्थी सेवा म्हणजे वूई टुगेदर फाउंडेशन
शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातच नाही तर जवळपास संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गरजुना आवश्यक निःस्वार्थी सेवेचे काम करणारे वूई टुगेदर फाउंडेशन आहे.चिंचवड येथे वूई टुगेदर फाउंडेशनची सर्वसाधारण सभा पार पडली यात सर्वांनुमते वूई टुगेदर फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी मधुकर बच्चे यांची एकमताने निवड करण्यात आली.सर्व पदाधिकारी,सदस्य,व मान्यवर यांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेऊन एवढी मोठी जबाबदारी दिली सर्वांचे मनःपूर्वक आभार या पदाला प्रामानिक न्याय देण्याचा प्रयत्न करीन संस्थेचे ब्रीद वाक्य निःस्वार्थी सेवा याला साजेसे कार्य होईल गरजुना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न राहील व सामूहिकपणे संस्थेचे कार्य आणखी पुढे नेईल अशी मधुकर बच्चे यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केली.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाने
अध्यक्ष:मधुकर बच्चे, सचिव:जयंत कुलकर्णी,सचिव: मंगला डोळे – सपकाळे उपाध्यक्षा सोनाली मन्हास खजिनदार, दिलीप चक्रे
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
क्रांतीकुमार कडुलकर, सलीम सय्यद, सीता केंद्रे, दिलीप पेटकर, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अनिल शिंदे, नवनाथ मोरे, दारासिंग मन्हास, सोनाली शिंदे, बळीराम शिंदे, विलास जगताप, शंकरराव कुलकर्णी, अरविंद पाटील, अर्जुन पाटोळे, धनंजय मांडके, खुशाल दुसाने तसेच जवळपास 50 सक्रिय सदस्य आहेत.
मावळते अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे,उपाध्यक्ष दिलीप पेटकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सभेत सादर केला.
या सभेत प्रमुख पाहुणे प्रा. दीपक जाधव, प्रा. वैशाली गायकवाड, ॲड. रमेश महाजन, ॲड. मनिषा महाजन, लायन्स क्लब कार्पोरेट चिंचवडचे अध्यक्ष रवींद्र काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैभव छाजेड आदी मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.