शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,शरद चंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय,डुडुळगाव, (आळंदी) पुणे. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवा सप्ताह अंतर्गत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले. या प्रसंगी प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा संजीव कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि भूमिका सविस्तर रेखाटली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व उदघाटक प्रा. विकास देशमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय,चाकण जि. पुणे यांनी स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा सप्ताह याचे सविस्तर विवेचन करीत स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्य याचा लेखाजोखा अनेक ऐतिहासिक उदाहरणे देत विद्यार्थ्यांसमोर मांडला. आजच्या युवकाला स्वामी विवेकानंदाच्या व्यायाम,योगसाधना व बुद्धीमत्तेची कशी आवश्यकता आहे तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जीवन व कार्य युवकांसाठी कसे प्रेरणादायी आहे तसेच स्वराज्याच्या स्थापनेसाठी राष्ट्रमाता जिजाऊंची कार्यतत्परता तसेच नियोजनात्मक भूमिका कशी महत्वपूर्ण ठरली त्याप्रमाणेच त्यांचा वसा आणि वारसा चालविण्याची आवश्यकता विशद केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकर्तत्वाचा आढावा घेऊन स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध उदाहरणे तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्यकर्तत्व आधुनिक काळात कशी महत्त्वाची आहे या संदर्भात मत व्यक्त करून स्वामी विवेकानंद सत्ता व संपत्ती या मोहापासून कसे दूर होते त्याचबरोबर त्यांना भारत भूमी स्वर्गापेक्षाही कशी श्रेष्ठ वाटत होती या संदर्भात विवेचन करून आजच्या तरुणांमध्ये संयम, धाडस, शुद्ध चारित्र्य, बुद्धिमत्ता, तत्परता,कार्यक्षमता व कर्तव्यनिष्ठा या गुणांची आवश्यकता विशद केली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवा सप्ताहामध्ये चॉकलेट डे, साडी डे, मिस मॅच डे, वन -पीस डे, हॅट डे,जीन्स पॅन्ट टी-शर्ट डे, ट्रॅडिशनल डे इत्यादी दिनविशेष व गीत गायन व काव्यवाचन स्पर्धा, डान्स स्पर्धा,पथनाट्य , निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार -श्री. मयूर मुरलीधर ढमाल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सविता मानके यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.पांडुरंग मिसाळ- मराठी विभाग प्रमुख, प्रा. माणिक कसाब- राज्यशास्त्र विभाग प्रमुख,प्रा. दिपाली ताम्हाणे- वाणिज्य विभाग प्रमुख,
प्रा. रोहित कांबळे, इंग्रजी विभाग प्रमुख , प्रा.प्रफुल्ल जाधव- बी.बी.ए.सी.ए.विभाग प्रमुख,श्री प्रवीण भावे कार्यालयीन अधीक्षक, सौ.वर्षा ताजणे,सौ.नेहा लांडगे प्रा.यशोदा आनेराव, प्रा. दिपाली सोनवणे,प्रा.महेश म्हसागर, प्रा.प्रभाकर गायकवाड,प्रा.पूजा खवले, प्रा.कविता मोरे,प्रा. रूपाली औटी, प्रा. पूजा खेडकर, श्री सचिन गावडे व सौ. तेजल चव्हाण, श्री वैभव बडवे व श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.