शबनम न्यूज | चिखली
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका हद्दीतील चिखली, मोरे वस्ती परिसरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी युवा नेते यश दत्ताकाका साने यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या दिवेदानात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील चिखली मोरे वस्ती या भागात मुख्य रस्ते, सोसायट्यांमधील अंतर रस्ते, ड्रेस लाईन इत्यादी कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये अंगणवाडी रस्त्याची स्ट्रॉंग वॉटर लाईनचे काम कोळंबले आहे, ते त्वरित पूर्ण करावे. तसेच परिसरातील बहुतांश सोसायट्यांमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच काही सोसायट्यांमधील ड्रेनेज वाहिनी जुन्या झाल्या आहेत, त्या बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, त्याचबरोबर वाघू साने चौक ते चिंचेचा मळा या रस्त्याचे तातडीने डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली करण्यात आली आहे.