शबनम न्यूज | पिंपरी
लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले. त्याचा जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार केले. पिंपरी येथील मिलिंदनगर कमानीजवळ मंगळवारी (दि. १४) रात्री पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली.
भूषण राजू डुलगूच (३४, रा. काळेवाडी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विनोद म्हस्के (४०, रा. पिंपरी) याला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण हे मिलिंदनगर येथे कमानीजवळ लघुशंका करीत होते. त्यावेळी इथे लघुशंका करू नका, असे संशयिताने सांगितले. त्यावर ‘तू कोण मला सांगणारा?’ असे फिर्यादी यांनी म्हटले असता संशयिताने चावीच्या गुच्छातील चाकूने भूषण यांच्यावर वार करीत त्यांना जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार पुढील तपास करीत आहेत. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
पिंपरी आणि परिसरात घडणाऱ्या गुंडगिरी, चोरीच्या घटनांबाबत पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळे असे गुन्हे करणारे गुन्हेगार पोलिसांच्या रडारावर असून योग्य वेळी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.