- आरोपीला जेरबंद ; सुमारे ९ लाख ३७ हजार ५०० लाख रुपयांची दागिने हस्तगत
शबनम न्यूज | चिंचवड
पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारला असल्याने एकाने आपल्या सख्ख्या बहिणीच्या १२५ ग्राम दागिन्यांची चोरी केली. सुमारे ९ लाख ३७ हजार ५०० लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना १३ जानेवारी २०२५ रोजी रजनीगंध हाउसिंग सोसायटी, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून नऊ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
श्रीकांत दशरथ पांगरे (वय २९, रा. रजनीगंध हाउसिंग सोसायटी, वाल्हेकर वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत याला जुगार खेळण्याची लत आहे. त्याने पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारली, त्यानंतर लोकांची उधारी-उसनवारी देण्यासाठी बहिणीचे दागिने चोरले. घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे मुद्दाम उघडा ठेवून घरी कोणी नसताना कपाटातील १२५ ग्राम वजनाचे दागिने चोरून त्याच्यावर कोणाचे संशय येऊ नये, म्हणून स्वतः बहिणी सोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्याच्याकडून एकूण ९ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे १२५g वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप डोईफोडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश गायकवाड, गणेश माने, प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, आतिश कुडके यांनी केली.