शबनम न्यूज | पिंपरी
पती-पत्नी वेगळे राहत असताना पतीने पत्नीच्या घरी जाऊन तिच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १५) चिखलीतील विजय एकता कॉलनीमधील मोरे वस्ती येथे घडली. याप्रकरणी २३ वर्षीय पत्नीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पती अंचल ललितकुमार मिश्रा (रा. पिरानगर, ता. कुंडा, जि.प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. संशयित व फिर्यादी पती- पर्न आहेत. त्यांच्यामध्ये भांडण झाल्याने ते वेगळे राहतात. याचा राग मनात धरून संशयित अंचल पत्नी राहत असलेल्य ठिकाणी गेला. तिथे तिला शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या वान केले. तो चाकू वाकल्याने दुसरा चाकृ घेऊन वार केले.
Advertisement