शबनम न्यूज , प्रतिनिधी :
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही मकर संक्राती निमित्त हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंगळे सौगदार , रहाटणी परिसरातील विविध महिला मंडळे आणि ग्रामस्थ महिलांनी या हळदी कुंकू समारंभाला आवर्जून उपस्थित लावली. सुमारे १५०० महिलांनी उन्नतीच्या हळदी कुंकवाचा लाभ घेतला.
पर्यावरण पूर्वक आणि औषधी गुणधर्म असलेल्या आणि भगवान पांडुरंगला परमप्रिय असलेली तुलसी रोपे हळदी कुंकुवाला वाण म्हणून देण्यात आली. यानिमित्ताने , महिलांसाठी उखाणे स्पर्धा आणि विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते.
या हळदी कुंकू समारंभास संस्थापक संजय तात्याबा भिसे , उन्नती सखी मंचच्या महिला सभासद , विठाई वाचनालयच्या महिला सभासद , ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनच्या महिला सभासद , आनंद हास्य क्लबच्या महिला सभासद आणि पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरातील महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.