शबनम न्यूज | पिंपरी
हल्ली सर्वांनाच नोकऱ्या शक्य नाही. विद्यार्थ्यांनी काहीतरी कला अवगत करून कला प्रांतात करियर करावे.असे आवाहन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केले.
चिखली येथील विश्वरत्न इंलिश मिडीयम शाळेच्या वतीने डॉ. सबनीस यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित कारण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी पो. निरीक्षक विठ्ठल साळुंके यांना कर्तव्यदक्ष अधिकारी आणि रंजना आव्हाड यांना “ज्ञान तपपूर्ती पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.
यावेळी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन कै.लांडगे नाट्यगृह येथे उत्साहात पार पडले.
यावेळी आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, ललिता सबनीस,रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, गुरदीप सिंग,दयानंद जेवळे, पत्रकार शिवाजी घोडे,गजानन वाघमोडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव वाघमोडे, सचिव रमाकांत वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साळुंके म्हणाले कि, लहान मुलांना पोलिस पकडून येतील असे सांगून भीती दाखवू नका. तुमच्या टॅक्स मधून आमचे पगार होत असल्याने आम्ही जनतेचे नोकर आहोत. काहीही समस्या असल्यास पोलिसांना कळवत चला. असे आवाहन साळुंके यांनी केले.
प्रास्ताविक व्यंकट वाघमोडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना आव्हाड, सुनीता बनसोडे यांनी तर आभार भगवती गडदे यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कांबळे, सोनली तापोळे,कावेरी दिवेकर,सई पांचाळ, माधवी हासूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.