शबनम न्यूज , प्रतिनिधी :
दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे महिला भगिनींसाठी चिखली घरकुल येथे भव्य आरोग्य शिबिर, हळदीकुंकू समारंभ आणि वृक्षारोपण समारंभ घेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी दुर्गा ब्रिगेड शहर उपाध्यक्ष सौ. राईसा ताई पठाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच दुर्गा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष कु दुर्गा भोर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे चिखली पोलीस स्टेशनच्या क्महिला पोलीस हवालदार दिपमाला लोहकरे,सहा.पोलीस फौजदार दिनेश ढवळे ,दामिनी पथक महिला पोलीस हवलदार सुजाता शिंदे ,महिला पोलीस अंमलदार अश्विनी सोनवणे महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष गोविंद वाकडे ,रोझी भानुशाली सी.एम.ओ ,उद्योजक रेवांना शिंदे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरोग्य शिबिरात विविध रोगांवर तपासण्या करण्यात आल्या स्त्रियांचे सर्व विकार व विविध चिकित्सा करण्यात आल्या तसेच परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ पार पाडला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तसेच याप्रसंगी दुर्गा ब्रिगेड चे महिला भगिनी उपस्थित होत्या रिझवाना शेख , वैभवी आरोळे, रूपाली निकम, अलका निकम, आशा सरोदे, आरती गोखले, रंजनाताई महानवर ,अशा कोळपे ,माही शेख, शकिरा शेख,,खदिर पठाण, राजेंद्र घायतळे , नितीन आरोळे ,इझरायल शेख, यशपाल सरोदे. आरोग्य शिबिर ला मोठ्या संखेने महिला हजर होत्या .