शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरद चंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयातील सांस्कृतीक विभाग व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची 128 जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाथा मोकाटे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या क्रांतिकारक, देशभक्ती व स्वातंत्र्य चळवळीतील दिलेल्या मौल्यवान कार्याचा उलगडा केला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार, मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या वेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ.पांडुरंग मिसाळ प्रवीण भावे, कार्यालयीन अध्यक्ष, प्रा. रोहित कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख,प्रा. प्रफुल्ल जाधव, बी.बी.ए. सी. ए. विभाग प्रमुख, प्रा. माणिक कसाब, राज्यशास्त्र विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख,प्रा.डॉ. देवानंद गोरडवार. सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. दिपाली ताम्हाणे, वाणिज्य विभाग प्रमुख,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. प्रतिभा गुंड,प्रा.कविता पिलावरे, प्रा. यशोदा आनेराव,प्रा. पूजा खेडकर,ग्रंथालय विभाग प्रमुख .प्रा.संदीप वाळुंज, राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. अतुल पानसरे, सौ.वर्षा ताजने, सौ.नेहा लांडगे, श्री. सचिन गावडे, सौ. तेजल चव्हाण, श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. देवानंद गोरडवार यांनी केले तर उपस्थितांनाचे
प्रा. माणिक कसाब, विद्यार्थी विकास अधिकारी यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.