शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दुर्गादेवी टेकडी ,निगडी प्राधिकरण या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.या वेळी शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे ,माजी आमदार जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार , उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार, युवा सेना प्रमुख चेतन पवार, शहर उपाध्यक्ष हरीश आबा नखाते, महिला उपशहर संघटिका वैभवी घोडके , चिंचवड विधानसभा संघटक संदीप भालके, आकुर्डी विभाग प्रमुख गोविंदराव शिंदे, निगडी विभाग प्रमुख सतीश मरळ ,युवा सेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटील ,युवा नेते संतोष सौंदणकर, प्रकाश देशमुख निवास शिंदे जगदीश पाटील कृष्णा माने आदी मान्य उपस्थित होते, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन उपशहर प्रमुख युवासेना पिंपरी चिंचवड शहर निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते.