शबनम न्यूज : मुंबई (दि.२४ जानेवारी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत आहे.कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.Advertisement— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
Advertisement