शबनम न्यूज | पुणे
व्यवस्थापन शास्त्र पदवी बीबीए, बीएमएस संगणक उपयोजन बीसीए पदवी अभ्यासक्रमांचे समाईक प्रवेश परीक्षेसाठी सीईटी 48,182 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्यसमायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे.
एमबीए, एमसीए या व्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धरतीवर बीसीए, बीबीए, बीएमएस हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारीत घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने एआयसीटीई घेतला. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी राज्य सीईटी सेलकडून घेण्यात येते, त्याच धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेतील गुणांचे आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे, त्यानुसार बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीची नोंदणी सुरू केली. आयुक्त महेंद्र वारभूवन यांनी जिल्हा माहितीनुसार बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमसाठी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम सीईटी 27 ते 29 मे या कालावधीत होईल.