शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : लोकसभा मतदार संघातील पुणे कॅन्टॉन्मेंट आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पदयात्रांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सायंकाळी वडगाव शेरी आणि बुधवारी सकाळी पुणे कॅन्टॉन्मेंट मतदार संघात शेकडो कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वडगाव शेरी येथील पदयात्रा मातृछाया हौसिंग सोसायटी येथून सुरु होऊन साईनाथ नगर येथे समाप्त झाली, तसेच पुणे कॅन्टॉन्मेंट मधील पदयात्रा लुंबिनी बौध्द विहार येथे सकाळी सुरु होऊन भारत टॉकिज येथे समाप्त झाली.
या पदयात्रांमध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. मार्गावर ठिकठिकाणी फुले उधळून पाठिंब्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. अनेक व्यापाऱ्यांनी धंगेकरांचा सत्कार केला व मार्गावरील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते देखील एकत्र जमून धंगेकरांचा सत्कार करीत होते. अपोलो थेटर जवळ रवींद्र धंगेकर यांना ‘महात्मा फुले पगडी’ डोक्यावर चढवून सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेस पक्षाचे चिन्ह ‘पंजा’ होते. जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून जात होता. दोन्ही पदयात्रांमध्ये प्रत्येकी ४०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
या पदयात्रांमध्ये उमेदवार रवींद्र धंगेकरांसमवेत पुणे कॅन्टॉन्मेंट मतदार संघात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संगीता तिवारी, अक्षय माने, सुजित यादव, पल्लवी जावळे, रवी आरडे, वैशाली रेड्डी, दत्ता पोळ, छाया वारभुवन, विजय वारभुवन, फय्याज शेख, प्रल्हाद विळेकर, राजेश शिंदे, मेहबूब नदाफ, शुभम कसबे, नतेंद्र भिंगारे, अय्याज खान, निलेश धुमाळ, नरेश नलावडे, गणेश शेडगे, महेश हाराळे, गोरख पळसकर, योगेश भोकरे, अमोल भोकरे, भारती कांबळे, बबलू कोळी, फिरोज शेख, प्रभाकर भिंगारे, चंद्रशेखर धावडे, चंद्रशेखर जावळे, नागेश शिंदे, दत्ता घोडेस्वार, कणव चव्हाण, ताई भिमाले आदी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वडगाव शेरी मतदार संघात उमेदवार आ. रवींद्र धंगेकरांसमवेत वडगाव शेरी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वडगाव शेरी अध्यक्ष आशिष माने, आम आदमी पार्टी वडगाव शेरी समन्वयक अमित म्हस्के, महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय अध्यक्ष अमीर शेख,पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेविका संगीता देवकर, माजी नगरसेवक सुनिल मलके, रमेश आढाव, संकेत गलांडे, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, प्रियांका रणपिसे,सीमा गट्टे, प्रकाश काळे, सोमनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन भुजबळ आदी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.