शबनम न्यूज / पिंपरी
शहरातील बांधकाम व्यावसायिक, व गृहनिर्माण सोसायटी संस्था, कामगार पुरवणार्या विविध संस्था यांनी त्यांच्या कडील कामगारांसाठी लस उपलब्ध करून वंचित कामगारांचे लसीकरण करावे असे आदेश द्यावे अशी मागणी माजी विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे निवेदनात म्हंटले आहे कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरात महाराष्ट्र शासन निर्देशानुसार लस उपलब्धेनुसार वय वर्षे १८ पुढील सर्व नागरिकांचे शहरात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील शासन निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरातील बांधकाम व्यावसायिक, व गृहनिर्माण सोसायटी संस्था यांनी त्यांचाकडे काम करणाऱ्या कामगारांसाठी लस उपलब्ध करून त्यांचे लसीकरण करून देण्यात यावे. संपूर्ण शहरात घर कामगार करणारे घर कामगार, खासगी सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांची संख्या देखील जास्त आहे तसेच येथे नव्याने रहिवासी बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत अश्या बांधकाम साईट वर काम करणारे देखील अनेक कामगार आहेत, यातील बहुतेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही, कोणतेही ओळखपत्र नाही व अनेकजण अशिक्षित असल्याने अश्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. या कामगारांचा कामाच्या ठिकाणी अनेक लोकांशी वारंवार संपर्क येतो अश्याने त्यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. ही बाब विचारात घेता संबधित बांधकाम व्यावसायिक व गृहनिर्माण सोसायटी पदाधिकारी, कामगार पुरवणार्या विविध संस्था यांनी त्यांचा कडील लसीकरणापासून वंचित असणार्या सर्व कामगारांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असे आदेश देण्यात यावे.
तरी माननीय आयुक्त महोदय आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील करोना प्रसार रोखण्यासाठी करोना प्रतिबंधित लस घेणे हे प्रभावी अस्त्र असल्याने वर नमूद केलेली बाब लक्षात घेता शहरातील बांधकाम व्यावसायिक, व गृहनिर्माण सोसायटी संस्था पदाधिकारी, कामगार पुरवणार्या विविध संस्था यांना त्यांच्या कडील कामगारांसाठी लस उपलब्ध करून वंचित कामगारांचे लसीकरण करावे असे आदेश देण्यात यावे.