दापोडी परिसरात सोसायट्यांमधिल कॉंक्रीटीकरण करणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि डागडुजीची कामांचे भूमी पूजन
शबनम न्यूज / पिंपरी
आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 30 मध्ये विविध विकास कामां संदर्भात नगरसेविका स्वाती माई काटे यांनी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे निवेदन दिले होते , दिलेल्या निवेदनात नगरसेविका स्वाती माई काटे यांनी प्रभाग क्रमांक 30 दापोडी परिसरात गणेश नगर परिसरातील सोसायट्यांमधिल कॉंक्रीटीकरण करणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि डागडुजीची कामे मार्गी लावण्यासाठी युवा नेते शेखर भाऊ काटे व सर्व सोसायटी मधिल चेअरमन यांच्यासह आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते व आपल्या आमदार निधीतून हि कामे करावी हि विनंती केली होती आमदार अण्णा बनसोडे यांनी हि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार आमदार निधीतून गणेश नगर व दापोडी परिसरातील सोसायट्यांमधिल कॉंक्रीटीकरण करणे, पेव्हिग ब्लॉक बसवणे या कामांचे भूमिपूजन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगरसेविका स्वाती माई काटे , नगरसेवक रोहित काटे,नगर सेवक राजू बनसोडे, युवा नेते शेखर काटे, सर्व पदाधिकारी , महिला पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते