शबनम न्यूज | मनोरंजन
मनोरंजन | प्रतिनिधी
ज्ञानप्रभात विद्यालय,सहयोगनागर मध्ये 22 जुलै 2021 रोजी कला समृद्धी आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव साठी प्रगतीची दिशा अध्यक्ष मा.कु.खुशी कुमारी साह यांनी वादा नावाच एक लघुचित्रपट तयार केले आहे.
ह्या चित्रपट निर्मिती मध्ये ज्ञानप्रभात विद्यालयाचे माध्यमिक मुख्याध्यापक मा.श्री.राहुल गवळी सर व प्राथमिक मुख्याध्यापिका मा.सौ.प्रज्ञा सोनवणे व म.श्री.शैलेश कांबळे यांचे विशेष सहकार्य होते.
या चित्रपटातील कलाकार सुप्रिया सायस रोडे,साहिल मोनिष राऊत,सत्यशीला बालाजी चक्रे,प्रियंका अभिजीत भोळे,सार्थक अशोक मगर,निर्भय कुमार साह,अभय बालाजी चक्रे व खुशी कुमारी साह हे आहेत.
हे एक भावनात्मक व हृदयस्पर्शी असे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या एका गरीब स्त्री ची गोष्ट आहे जी अशिक्षित आहे पण दिवस-रात्र काम करून तिच्या मुलीला खूप मोठ्या शाळेत शिकवत आहे. तिला एक अतिशय भयानक आजार असते पण ती बाई मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतील म्हणून स्वतःच इलाज सुद्धा नाही करून घेत पण मुलीच्या शाळेत गेल्यावर मुलगी अस काही बोलती की ..आता हे तर तुम्हाला चित्रपट बघितल्या वरचं कळेल हे चित्रपट तुम्हाला 26 जुलै 2021 रोजी युट्युब वरती बघता येईल. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल याच आम्हाला पूर्ण विश्वास आहे.